Sorry for non-Marathi readers .. can't translate this for you ...
आटपाट नगर होतं. तिथे एक बंड्या जोशी नावाचा मुलगा रहायचा आई-बाबांसोबत. बंड्याचे चिमखडे बोल सगळ्यांना खूप खूप आवडायचे. त्यामुळे झालं काय की बंड्याला वाटायला लागलं आपण लय भारी बोलतो. पण बंड्या ४ वर्षाचा झाला तरी अजून बोबडंच बोलत होता. त्यामुळे आई रागावली. तर बंड्याला वाटलं ती बोलूच नको असं म्हणतेय. त्यामुळे "जा आता मी तुझ्याशी बोलणारच नाही" असं आईला म्हणून तो गप्प बसला.
आणि एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपल्यावर अन्याय होतोय. आणि मग त्याने आई-बाबांच्या विरुद्ध बंड करायचं ठरवलं.
जेवताना त्याने पाहिलं आई आपल्याल दोनच पोळ्या देते पण बाबांना मात्र ४-५ मिळतात. म्हणून त्याने एकदा आईला विचारलं असं का? आई म्हणाली अरे बाबा मोठे आहेत म्हणून त्यांना जास्त पोळ्या. पण ह्या उत्तराने बंड्याचे काही समाधान झाले नाही. "जा आता मी तुझ्याशी बोलणारच नाही" असं आईला म्हणून तो गप्प बसला.
पण दुसर्या दिवशी पुन्हा आईच्या मागे लागला "बाबांना फुल पँट नी मला हाफ चड्डी का?" आई नी पुन्हा समजावलं की ते मोठे आहेत म्हणून. पण तरीही बंड्याचे समाधान झाले नाही. आई ने पुन्हा समजावलं "अरे बंड्या तुझ्याच्यानी २ पोळ्याही संपत नाहीत आणि तू अजून शाळेतही जात नाही. मग तुला काय करायच्यात ५ पोळ्या नी फुल पँट?" तरी बंड्याचं समाधान झालं नाही. "जा आता मी तुझ्याशी बोलणारच नाही" असं आईला म्हणून तो गप्प बसला.
तिसर्या दिवशी त्याच्या असं लक्षात आलं की बाबांना यायला आज-काल उशीर होतोय. त्याने पुन्हा आईला विचारलं "आई बाबा बॉसला रागावत का नाहीत? संप का करत नाहित?" त्यावर आई म्हणाली अरे काम केलं की प्रमोशन मिळतं, प्रमोशन मिळालं की पगार वाढतो, पगार वाढला तरच आपल्याला सुखा समाधानात जगता येइल.
ह्यावर पुन्हा बंड्याने डोकं चालवलं. म्हणाला "म्हणजे माझ्या मुळे आपल्याला सुखा समाधानात जगता येइल." ह्यावर आई चक्रावून गेली. काम करतात बाबा, घर सांभाळते मी, हा अजून शाळेतही जात नाही नी वर म्हणतो माझ्यामुळे आपल्याला सुखा समाधानात जगता येइल. आईने विचारलं कसं काय?
तर त्यावर बंड्या म्हणाला "अगं, जर मी आक्रस्ताळे पणे वागू लागलो तर बाबांचं कामात लक्ष लागेल का? कामात लक्ष लागलं नाही तर नोकरी जाईल आणि बाबांची नोकरी गेली की आपण सगळे रस्त्यावर येऊ. त्यामुळे मी जरी दिवसभर घरी खेळत असलो नी बाबा काम करत असले तरी मी नी बाबा समानच. उलट मीच जास्त महत्वाचा." आईला हसू आले पण तिने ते कसे बसे थांबवले.
बंड्या पुढे म्हणाला "आता तू घर आवरतेस कबूल. पण मी दिवसभर घरात पसारा करायचे ठरवले तर तू कितीही आवरून काय उपयोग? त्यामुळे तू घर आवरतेस ह्या पेक्षा मी मुद्दामून पसारा करत नाही हे जास्त महत्वाचे." आई ने पुन्हा हसू आवरले.
आई ने मग विचार केला की इतके दिवस तर बंड्या शहाण्या सारखा वागत होता, अचानक काय झाले त्याल. विचार केल्यावर तिच्या लक्षात आलं की आज काल बंड्याचं कुणी कौतूक करेनासं झालंय. जे बोबडे बोल लोकांना आवडायचे ते बंड्या मोठा झाल्याने आवडेनासे झालेत. त्यामुळे बंड्या विचित्र वागून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे आईला कळल्यावर आई मनातल्या मनात हसली.
संध्याकाळी आईनी बाबांना बंड्याचे उपद्व्याप सांगितले. बाबांनी बंड्याल कोपर्यात अंगठे धरून ओणवं उभं केलं. बंड्या आई वर पुन्हा रागावला. "जा आता मी तुझ्याशी बोलणारच नाही" असं आईला पुन्हा एकदा म्हणून तो पुन्हा गप्प बसला. आई मनातल्या मनात पुन्हा हसली.
तात्पर्य - जसं अ ब क ड लिहीता आल्यने कुणी वाल्मीकी होत नाही तसंच बोबडं बोलता आल्याने कुणी तानसेन होत नाही.
And sorry for Marathi readers too .. Neither I have understood anything nor I can help you understand anything from it.
If you have understood something, do let me know. I'll give you party at Hard Rock Cafe .. see the post below ..
बंड्याचे बंड
Thursday, September 25, 2008
|
Labels:
?
|
This entry was posted on Thursday, September 25, 2008
and is filed under
?
.
You can follow any responses to this entry through
the RSS 2.0 feed.
You can leave a response,
or trackback from your own site.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
mala hi tatparya kalala nahi....wat does it imply? nd why did Bandya's mom, didnt try to cure his insecurities, instead of laughing at him???
wohi to ... I read it on one community and got confused. posted it here.
since you have not understood anything, there is no party for you at Hard Rock Cafe :)
Post a Comment